Crime News: १० हजार दे नाहीतर वाईट होईल..! नकार दिल्यावर मैत्रिणीवर दगडाने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:27 IST2026-03-31T11:22:49+5:302026-03-31T11:27:54+5:30

पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यावर दगड मारला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या.

Crime News Give me 10 thousand or else it will be bad Friend attacked with a stone after refusing | Crime News: १० हजार दे नाहीतर वाईट होईल..! नकार दिल्यावर मैत्रिणीवर दगडाने हल्ला

Crime News: १० हजार दे नाहीतर वाईट होईल..! नकार दिल्यावर मैत्रिणीवर दगडाने हल्ला

पिंपरी : मैत्रिणीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने महिलेला दगडाने मारहाण करत जखमी केले आणि तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. २९ मार्च) रात्री एकच्या सुमारास टाळगाव चिखली येथे घडली.

जरीना अब्दुल मन्सुरी (वय २८, रा. पिंपरी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करण विलास महापुरे (वय ३६, रा. टाळगाव चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित गप्पा मारत थांबले असताना संशयिताने फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यावर दगड मारला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. संशयिताने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरून नेली. पोलिस उपनिरीक्षक राजेश मासाळ तपास करीत आहेत.

Web Title : पैसे देने से इनकार करने पर हमला, चेन छीनी

Web Summary : पैसे देने से इनकार करने पर तलेगांव चिखली में महिला पर पत्थर से हमला, सोने की चेन छीनी। आरोपी गिरफ्तार; जांच जारी।

Web Title : Refusal to Give Money Leads to Attack, Chain Snatching

Web Summary : Woman attacked with stone, gold chain stolen in Talegaon Chikhli after refusing to give ₹10,000. Accused arrested; investigation underway.