चिखली- देहू रस्त्यावरील भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:36 IST2021-12-11T12:33:11+5:302021-12-11T12:36:18+5:30

चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल...

couple died in a tragic accident on chikhali dehu road pune | चिखली- देहू रस्त्यावरील भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

चिखली- देहू रस्त्यावरील भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार दांपत्याचा मृत्यू झाला. चिखली- देहू रस्त्यावर शेलारवस्ती, चिखली येथे शुक्रवारी (दि. १०( दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. बाळू बाबुराव उगवे (वय ६३) आणि मीरा बाळू उगवे (वय ५२), अशा अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोज बाळू उगले (वय ३२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार चाकी वाहन चालक नेताजी भिसे (रा. भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू उगवे आणि फिर्यादीची आई मीरा उगवे हे दोघेही दुचाकीवरून सांगुर्डे देहूगाव येथे जात होते. त्यावेळी चिखली- देहू रस्त्यावर शेलारवस्ती येथे आरोपीच्या भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादीचे आई वडील गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: couple died in a tragic accident on chikhali dehu road pune