स्वयंपाक येत नाही म्हणून सतत छळ; अठरा वर्षीय विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:35 IST2022-07-15T18:34:47+5:302022-07-15T18:35:00+5:30

मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी साडीने गळफास घेतला

constant harassment for not being able to cook Eighteen-year-old married woman commits suicide | स्वयंपाक येत नाही म्हणून सतत छळ; अठरा वर्षीय विवाहितेची आत्महत्या

स्वयंपाक येत नाही म्हणून सतत छळ; अठरा वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : स्वयंपाक येत नाही म्हणून सतत छळ होत असल्याने १८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडेजवळील वराळे येथे २६ जूनला घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. १४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती समाधान मधुकर बोर्डे (वय. २२ रा. बालाजीनगर, वराळे मूळ रा. रागोदेगावता जिल्हा जालना) याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

मुलीला स्वयंपाक येत नाही, घरकाम नीट करत नाही, आई-वडिलांशी नीट बोलत नाही. या कारणावरून अबोला धरत पीडितेला मारहाण केली. सततच्या या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी साडीने गळफास घेतला. तिला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

Web Title: constant harassment for not being able to cook Eighteen-year-old married woman commits suicide