पिंपरीत बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन संगणक अभियंत्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:05 IST2019-04-18T19:04:33+5:302019-04-18T19:05:47+5:30

इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली.

Computer Engineer Suicide by jumping from 12th floor | पिंपरीत बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन संगणक अभियंत्याची आत्महत्या 

पिंपरीत बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन संगणक अभियंत्याची आत्महत्या 

पिंपरी : इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील रॉयल ग्रीन फेज एक या सोसायटीमध्ये ही घटना घडली. 
रोहित बापूराव पाटील (वय २८, रा. रहाटणी, मूळ-धुळे) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी, रोहित हे हिंजवडीतील एका कंपनीत अभियंता असून ते रहाटणी येथे भावासमवेत राहत होते. गुरुवारी दुपारी रोहित यांचा भाऊ कामाला गेला होता. दरम्यान ते घरातून इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील गच्चीवर गेले. तेथून खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत..
 

Web Title: Computer Engineer Suicide by jumping from 12th floor