महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

By Admin | Updated: August 20, 2015 02:30 IST2015-08-20T02:30:02+5:302015-08-20T02:30:02+5:30

भक्ती-शक्ती चौक निगडी येथे सकाळी सातच्या सुमारास ट्रकची दुचाकीला पाठीमागून ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात करुणा हरेश परमार ही १७ वर्षांची

College student killed | महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

पिंपरी : भक्ती-शक्ती चौक निगडी येथे सकाळी सातच्या सुमारास ट्रकची दुचाकीला पाठीमागून ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात करुणा हरेश परमार ही १७ वर्षांची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी युवती जागीच ठार झाली. तर, दुचाकीवरील तिचे वडील आणि बहीण दोघेही जखमी झाले. ट्रकचालकास निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. करुणा आणि खुशबू या मुलींना महाविद्यालयात सोडण्यास जात असताना परमार कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.
निगडी-प्राधिकरणातील इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट (आयआयसीएमआर) या महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मागील महिन्यात झालेल्या अपघातात असाच दुर्दैवी अंत झाला होता. २२ जुलैला दोन दुचाकीवर पाच विद्यार्थी रात्री निगडी जकात नाका येथे चहा पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारीने दुचाकींना जोराची धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील किरण दिलीपराव गाने (वय २४), संकेत कमलाकर समेळ (वय २३), शुभम संभाजी भालेकर (वय २३) तीन विद्यार्थी ठार झाले होते. अन्य दोन जण जखमी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: College student killed