पालकांचा मुख्याध्यापिकेला घेराव

By Admin | Updated: June 24, 2016 01:52 IST2016-06-24T01:52:15+5:302016-06-24T01:52:15+5:30

भाटनगर येथील नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी व सहावीच्या वर्गास शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने पालकांनी मुख्याध्यापिकेला घेराव घातला.

Circle of parents' headmistress | पालकांचा मुख्याध्यापिकेला घेराव

पालकांचा मुख्याध्यापिकेला घेराव

पिंपरी : भाटनगर येथील नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी व सहावीच्या वर्गास शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने पालकांनी मुख्याध्यापिकेला घेराव घातला.
शाळेची पहिली ते पाचवीची पटसंख्या ४५३ आहे तर सहावीची ६८ आहे. शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले तरीही शिक्षक नाहीत. शिक्षकांच्या ५ रिक्त जागा भरावयाच्या आहेत. त्यामध्ये सकाळ विभागासाठी दोन व दुपार विभागासाठी तीन शिक्षक हवे आहेत, असा पत्रव्यवहार मुख्याध्यापकांनी शिक्षण मंडळ प्रशासनाकडे केला आहे. त्याची दखल शिक्षण मंडळाने घेतली नाही. पंधरा दिवसापूर्वीच शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्या. त्यामध्येही भाटनगर शाळेचा उल्लेख नव्हता. शिक्षक मिळणार की नाही या विवंचनेतच पालक आहेत. अन्यथा दूसरीकडे प्रवेश घेऊ, असे पालकांनी सांगितले.
दोन वर्षांपासून शाळेत मुले व कन्या विभागासाठी पूर्णवेळेसाठी मुख्याध्यापकच नाही. दोन सत्रामध्ये मुले व मुलींची शाळा भरत आहे. दोन्ही सत्रांमध्ये मिळून मुख्याध्यापक
एकच आहे. त्यासाठी स्वतंत्र मुख्याध्यापक असावा, अशी मागणी वारंवार झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Circle of parents' headmistress