बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल; एकजण ताब्यात तर दोघे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:08 IST2021-07-12T18:08:37+5:302021-07-12T18:08:47+5:30
अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन समजपत्र देऊन त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान त्याचे दोन्ही साथीदार दुचाकीवरून फरार

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल; एकजण ताब्यात तर दोघे फरार
पिंपरी: बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी शस्त्र बाळगण्यास मनाई केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सुमित धोत्रे, कृष्णा (दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई रमेश दोरताले यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पाच वाजता एच ए कॉलनीच्या गेट समोर तिघेजण घातक शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. कोयता बाळगल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन समजपत्र देऊन त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान त्याचे दोन्ही साथीदार दुचाकीवरून पळून गेले.