Bite the ear with the finger taken as the bike issue; Crime registred against youth at Wakad | दुचाकी आडवी घातली म्हणून घेतला बोटासह कानाला चावा; वाकड येथे तरुणावर गुन्हा

दुचाकी आडवी घातली म्हणून घेतला बोटासह कानाला चावा; वाकड येथे तरुणावर गुन्हा

पिंपरी : दुचाकी आडवी घातली म्हणून मारहाण करून बोटाला व कानाला चावा घेतला. तसेच शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तुला आता खल्लास करतो, अशी धमकी देऊन तलावर हातामध्ये फिरवली. वाकड येथे बुधवारी (दि. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

राजू सिद्राम रणदिवे (वय ४०, रा. वाकड पोलीस लाईनजवळ, अण्णा भाऊ साठे नगर, वाकड) यांनी या प्रकरणी बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश महादेव माडवकर (वय २१, रा. अण्णा भाऊ साठे नगर, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोरून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी घातली. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बोटाला व कानाला चावा घेतला. त्यानंतर तलवार हातामध्ये घेऊन फिरवून ‘तुला आता खल्लास करतो’, अशी धमकीही आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Bite the ear with the finger taken as the bike issue; Crime registred against youth at Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.