शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी

By प्रकाश गायकर | Updated: November 23, 2024 15:10 IST

Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली असून शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांचा पराभव केला

Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live : भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे हे 63 हजार 634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला. लांडगे यांच्या विजयानिमित्त भोसरी परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. तसेच महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला.  बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या फेरीचा निकाल हातात येण्यास पावणे अकरा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग संथ होता. मात्र, नंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतमोजणी केंद्रावर पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.

 पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. तीन वाजेपर्यंत मतमोजणीच्या 23 फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर अजित गव्हाणे होते. लांडगे यांना 2 लाख 21 हजार 578 मते मिळाली. त्यांचा 63 हजार 634 मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव झाला. 

कार्यकर्त्यांचा जल्लोष

महेश लांडगे यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम होती. विजय घोडदौड सुरू असतानाच दुपारी एक वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' म्हणत जल्लोष केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024bhosari-acभोसरीmahesh landgeमहेश लांडगेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार