पिंपरीत बरसला; मावळात रुसला

By Admin | Updated: June 22, 2016 00:43 IST2016-06-22T00:43:22+5:302016-06-22T00:43:22+5:30

नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले असून, आर्द्रा नक्षत्रातील पाऊस आज पिंपरी-चिंचवडमध्ये बरसला. पाचच्या सुमारास तासभर पडलेल्या पावसाच्या सरींनी रस्त्यांवर ठिकठिकाणी

Berla in pimple; Rousseau in Maaval | पिंपरीत बरसला; मावळात रुसला

पिंपरीत बरसला; मावळात रुसला

पिंपरी : नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले असून, आर्द्रा नक्षत्रातील पाऊस आज पिंपरी-चिंचवडमध्ये बरसला. पाचच्या सुमारास तासभर पडलेल्या पावसाच्या सरींनी रस्त्यांवर ठिकठिकाणी डबकी साचली. शेतीसाठी पावसाची आस लागलेल्या मावळ परिसरातील लोणावळा, तळेगावात मात्र पाऊस पडला नाही.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, काळेवाडी, सांगवी, रावेत या भागात तासभर पाऊस झाला. दुपारनंतर आकाशातील वातावरण ढगाळ झाले. पाऊस येण्याची चाहूल लागली. हवेत गारवा वाढला. पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू होताच काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सहा-साडेसहापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. मावळातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणी झाली असली, तरी रोपांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे. मावळात मोठ्या प्रमाणावर भातशेती आहे. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाची रिपरिप कायम राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. (प्रतिनिधी)

Web Title: Berla in pimple; Rousseau in Maaval