शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव भिशीचे आठ लाख केले हडप

By admin | Updated: August 18, 2015 23:57 IST

महापालिकेत भूमी जिंदगी विभागात लिपिक पदावर काम करणाऱ्या एकाने महापालिकेत विविध विभागांत नोकरीस असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना लिलाव भिशीत

पिंपरी : महापालिकेत भूमी जिंदगी विभागात लिपिक पदावर काम करणाऱ्या एकाने महापालिकेत विविध विभागांत नोकरीस असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना लिलाव भिशीत पैसे गुंतविण्यास भाग पाडले. सप्टेंबर २००९ पासून त्यांच्याकडून दरमहा वसूल केलेले सुमारे आठ लाख रुपये हडप केले असून, कोणालाही भिशीची परतावा रक्कम दिलेली नाही. आर्थिक फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना चिंचवड पोलिसांनी बुधवारी बोलावले असून, त्यांचे म्हणणे एकूण घेऊन तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. लिलाव भिशीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पैसे उकळण्याचा उद्योग करणारा हा महापालिकेचा कर्मचारी स्थानिक (गाववाला) आहे. त्याचा प्रशासनात दबदबा असल्याने आतापर्यंत घडल्या प्रकाराबाबत आवाज उठविण्यास कोणीच पुढे येत नव्हते. अरविंद अटकर मंगळवारी भिशीच्या परताव्याचे पैसे मागण्यासाठी गेले. त्यांना उद्धट वागणूक देऊन मारहाण करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी या भिशीत पैसे गुंतविले आहेत, अशा अन्य सहकाऱ्यांना घेऊन मंगळवारी दुपारी अटकर चिंचवड पोलीस ठाण्यात गेले. सविस्तर माहिती घेऊन बुधवारी या प्रकरणी दखल घेतली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर तक्रार देण्यास गेलेले महापालिकेचे कर्मचारी परत आले. (प्रतिनिधी)