शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: सासूच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 12:51 IST

जावयाकडून लोखंडी टॉमीने डोक्यात, चेहऱ्यावर व इतर ठिकाणी मारून सासूला गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्देपिंपळे निलख येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडलीयाप्रकरणी आरोपी जावयावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे

पिंपरी : शहर परिसरात रस्त्यात अडवून शिवीगाळ करून सासूला मारण्याची धमकी देऊन लोखंडी टॉमीने डोक्यात मारून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी जावयावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. इंगवले चौक, पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजी संजय लोंढे उर्फ पप्या (रा. पिंपळे निलख), असे आरोपी जावयाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक हेमा सोळंंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सविता विकास धुताडमळ, असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी असलेल्या सविता धुताडमळ या आरोपी शिवाजी लोंढे याच्या सासू आहेत. आरोपीने त्याच्या लहान मुलास मारहाण केली. त्यामुळे सासू सविता धुताडमळ यांनी आरोपी जावई शिवाजी लोंढे याला त्याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून आरोपीने सासू सविता यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तुला खल्लास करून टाकतो, असे आरोपी हा सासू सविता यांना म्हणाला. त्यानंतर लोखंडी टॉमीने डोक्यात, चेहऱ्यावर व इतर ठिकाणी मारून सासू सविता यांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 

गंभीर जखमी झाल्याने सासू सविता धुताडमळ या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिवाजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत.