प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

By नारायण बडगुजर | Published: November 22, 2023 05:46 PM2023-11-22T17:46:16+5:302023-11-22T17:46:30+5:30

प्रियकराने ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते तसेच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते

As the lover refused the marriage the girlfriend took the extreme step | प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी : तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. हिंजवडी येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली.  

आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. २१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गौरव पाटील (रा. धुळे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील आणि फिर्यादी महिला हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. तरीही गौरव याने फिर्यादी महिलेच्या मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले. त्याने फिर्यादी महिलेच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. या नैराश्यातून तरुणीने राहत्या खोलीत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.

Web Title: As the lover refused the marriage the girlfriend took the extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.