शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर अलिशान वाहनांची चोरी करणारा अटकेत; १ कोटी १३ लाख रुपयाची वाहने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 07:49 IST

आरोपी हरिद्वार येथून परत राजस्थानकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला अजमेर येथे शिताफीने पकडले. पिंपरी पोलीस ठाण्यातील स्कॉर्पिओ चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

पिंपरी : शहरातून अलिशान वाहनांची चोरी करून त्यांचा वापर राजस्थान राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. या टोळीने शहरातून १२ महागड्या वाहनांची चोरी केली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी या टोळीचा महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये शोध घेत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १ कोटी १३ लाख रुपये किमतीच्या सहा मोटारी जप्त केल्या आहेत.

ओमप्रकाश लादुराम बिस्नोई (वय २८, रा. रोहिला, जि. बाडमेर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आरोपींचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या मोटारी चोरीला जाण्याचे सत्र सुरु होते. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तपास करीत होते. शहरातून चोरीला गेलेल्या वाहनांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातून मोटारी चोरून त्यांची राजस्थान राज्यात विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. ही टोळी राजस्थान मधून येऊन अलिशान वाहनांची चोरी करीत असे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ओमप्रकाश याचा हरिद्वारपर्यंत पाठलाग केला. आरोपी हरिद्वार येथून परत राजस्थानकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला अजमेर येथे शिताफीने पकडले. पिंपरी पोलीस ठाण्यातील स्कॉर्पिओ चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसह मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून एकूण १२ महागड्या मोटारी चोरल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, निगडी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, भोसरी, देहूरोड, वाकड, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एक असे एकून डझनभर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

बॅरीगेट तोडण्यासाठी लोखंडी बंपर अमंली पदार्थांची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले तर बॅरीगेट तोडता यावेत यासाठी लोखंडी बंपर आणि त्याच्या वरून कंपनीचा खरा प्लास्टिक बंपर लावला जात असे. आरोपी चोरलेली वाहने राजस्थान येथे नेत. तिथे मोटारींचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबर ग्रॅडरच्या सहाय्याने घासून ते बुजवून टाकत. त्यामुळे मोटारीच्या ओळखीच्या खुना नष्ट होत असत. 

आरोपी पकडण्यासाठी पोलिसांचा हजारो किलोमीटर प्रवासपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मार्च २०१९ मध्ये चोरी झालेले वाहन धुळे येथे पकडले होते. त्यावेळी पंजाब राज्यातील आरोपींना पोलिसांनी पकडले होते. तर अलीशेर उर्फ इम्रान समशेर अहमद (रा. औरंगाबाद. मूळ रा. अजमगड, उत्तर प्रदेश) याला बुलढाणा येथून अटक केली होती. हे आरोपी चोरलेली वाहने दुसऱ्या राज्यात नेऊन विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिटच्या पोलिसांनी पंजाब, राजस्थान असा हजारो किलोमीटर प्रवास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी