शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘माथाडी’च्या तथाकथित नेत्यांना बसणार चाप

By admin | Updated: September 14, 2016 00:40 IST

माथाडी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या काही तथाकथित माथाडी, हमाल व श्रमजीवी कामगार संघटना

पिंपरी : माथाडी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या काही तथाकथित माथाडी, हमाल व श्रमजीवी कामगार संघटना, तसेच त्यांच्याशी संबंधित नेते यांच्याकडून माथाडी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी शासनाने कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा समिती स्थापन करण्याचा अध्यादेश उद्योग व कामगार विभागाने काढला आहे. त्यामुळे तथाकथित माथाडी संघटना नेत्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज कॉमर्सचे अध्यक्ष अ‍ॅड़ अप्पासाहेब शिंदे यांनी दिली़शहरातील कोणत्याही कारखाना व कंपनीसमोर माल घेऊन आलेला ट्रक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडीच्या नावाखाली वाराई, एन्ट्री टॅक्स घेतला जातो. कामगार भरतीकरिता कंपनी मालकावर दबाव टाकणे, विशिष्ट रकमेची मागणी करणे, संघटनेच्या नावाने अनधिकृत लेटरहेड छापून खोटा पत्रव्यवहार करणे, यांसारख्या प्रकारांमुळे उद्योगनगरीच्या हद्दीत कंपनी मालकांमध्ये माथाडी संघटनांच्या तथाकथित नेत्यांनी धास्ती निर्माण झाली आहे. परंतु शासनाने आता गंभीर दखल घेऊन नवीन आदेश दिल्यामुळे या प्रकारास आळा बसणार आहे. बोटावर मोजण्याइतपत काही माथाडी कामगार संघटना कायद्याच्या आधारे काम करतात. उर्वरित माथाडी कामगार संघटनांच्या नेत्यांच्या अरेरावीमुळे पुणे जिल्ह्यातील कारखानदार वर्ग भयभयीत झाला आहे. खंडणी, हप्तेवसुली, दमदाटी हा मार्ग अवलंबल्याने उद्योजकांमध्ये चिंंतेचे वातावरण होते़ माथाडी कायद्याचा होणारा दुरुपयोग थांबविण्यासाठी शासनाचा कामगार विभाग, एमआयडीसी व पोलीस यंत्रणेशी चर्चा करून संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़. या वेळी चेंबरचे पे्रमचंद मित्तल, रंगनाथ गोडगे-पाटील, विनोद बन्सल, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आदी उपस्थित होते.