पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालय जवळ इलेक्ट्रीक दुचाकीने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 17:20 IST2023-10-29T17:19:50+5:302023-10-29T17:20:29+5:30
इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी मध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली

पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालय जवळ इलेक्ट्रीक दुचाकीने घेतला पेट
पिंपरी : वायसीएम रुग्णालयाजवळ शनिवारी (दि.२८) सकाळी साडेआठच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने पेट घेतला आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही.
अचानक गाडीने पेट घेतल्याने जवळची वाहने बाजूला करण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या जवळ इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला. डिक्कीमध्ये लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं. दरम्यान, तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी मध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, मात्र गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.