पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा राजकारणामध्ये अजितदादांनी १९९१ पासून लक्ष घातले. तेव्हापासून त्यांच्याशी आमचे कौटुंबिक नाते निर्माण झाले. महापौर, शहराध्यक्ष होण्यासाठी मदत केली, असे सांगत होते, राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे. माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासामध्ये अजितदादांचे मोठे योगदान आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. येथील विविध विकास प्रकल्प असो किंवा कार्यकर्त्यांना नेत्यांना ताकद देणे असो, पक्ष वाढवणे असो यासाठी अजितदादांनी रक्ताचे पानी केले. त्यांच्या परिश्रमामुळेच आज पिंपरी- चिंचवड शहर उभे राहिले आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी लक्ष्मण जगताप, विलास लांडे आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. खरे तर त्यांचे आणि आमचे कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. मोठे बंधू म्हणून नेहमी मार्गदर्शन करायचे. राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून काम करू लागल्यानंतरही त्यांनी पिंपरी चिंचवडवरील लक्ष कधी कमी केले नाही. पिंपरी- चिंचवड शहराची ओळख ही राज्यभर व्हावी, यासाठी त्यांनी मोठमोठे प्रकल्प राबवले. माझ्या महापौर पदाच्या कालखंडामध्ये पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना करण्यासाठी भाऊसाहेब भोईर यांना मदत केली होती. नाट्य परिषदेचे स्थापना करण्यामध्ये दादांचे योगदान आहे. त्याचबरोबर दादांनी विविध कार्यकर्त्यांना उभे केले. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केले. जिल्ह्याचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अनेक लक्ष्मण जगताप, विलास लांडे अशा कार्यकर्त्यांना आमदार केले. त्याचबरोबर मला महापौर, पत्नी उषा वाघिरे यांना स्थायी समिती सभापती तसेच मला शहराध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी दिली होती. दादा यांच्या जाण्याने पक्षाला मोठा या शहराला मोठा फटका बसला आहे.
Web Summary : Sanjog Waghere credits Ajit Pawar's guidance and support for his political success in Pimpri-Chinchwad, including becoming mayor and city president. Pawar's contributions were vital for the city's development and nurturing leaders.
Web Summary : संजोग वाघेरे ने पिंपरी-चिंचवड में अपनी राजनीतिक सफलता का श्रेय अजित पवार के मार्गदर्शन और समर्थन को दिया, जिसमें महापौर और शहर अध्यक्ष बनना शामिल है। शहर के विकास और नेताओं के पोषण में पवार का योगदान महत्वपूर्ण था।