शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही दारूविक्री जोमात

By admin | Updated: July 27, 2015 03:54 IST

पुणे-लोणावळा लोकल रेल्वे गाडीतून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारूची तस्करी होत आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूला आडोशाला गावठी

पुणे-लोणावळा लोकल रेल्वे गाडीतून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारूची तस्करी होत आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूला आडोशाला गावठी व देशी दारू सांकेतिक भाषेत विक्री केली जाते. शासनमान्य दारू दुकानातील देशी दारूच्या बाटल्या घेऊन ग्रामीण भागात वाढीव किमतीला मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री केली जाते. महामार्गालगत असलेल्या बेकायदा चायनीज टपऱ्या व हॉटेल व्यावसायिकांकडून मासिक ५ ते १० हजार रुपये हप्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे खासगी हस्तक गोळा करतात. त्या व्यावसायिकांना बेकायदा गावठी व देशी दारूविक्री करण्याची परवानगी दिली जाते. ते व्यावसायिक चायनीज टपऱ्या व बेकायदा हॉटेलमध्ये राजरोसपणे गावठी व देशी दारू विक्री जोमात करत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी कारवाईच्या नावावर प्रत्येक चायनीज टपऱ्या व बेकायदा हॉटेल व्यावसायिकांकडून हप्ता घेतात.या भागातील दारू तयार करून ती कॅनमध्ये भरून पवनानगर, करुंज, महागाव, अंजली या भागामध्ये विक्रीसाठी नेली जाते. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. या नशेपायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. बऊरमध्ये रणरागिणींनी अखेर दारूचे डबे रस्त्यावर ओतून हे धंदे उद्ध्वस्त केले. त्यामुळे खुलेआम सुरू असणारी दारूविक्री आता बंद झाली आहे. परंतु येथे काही भागामध्ये लपूनछपून हा व्यवसाय सुरू आहे.देहूगाव : राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात दारूबंदी लागू असली, तरी पोलीस व काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने घरगुती स्वरूपात व हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीसह काही नामांकित कंपन्यांचे लेबल असलेल्या दारूची विक्री केली जात आहे. याकडे सर्व स्तरावर डोळेझाक केली जात आहे. दहा वर्षांपूर्वी दारूबंदी करावी यासाठी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. देहूगावामध्ये दारूबंदी व आठवडे बाजारात मासे, बोंबील आदी विकण्यावर बंदी घालण्याची मागणी काही नागरिकांनी केली होती. काही काळ गावातील दारूविक्री बंद झाली. कालांतराने गावाची हद्द सोडून तळवडे गावातील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भागात गावठी दारू व मांस, मासे विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्द व येलवाडी गावाच्या हद्दीतही विक्रीला राजरोस सुरुवात झाली. ज्या कार्यकर्त्यांनी दारूबंदीसाठी उपोषण केले होते, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. साहजिकच पोलिसांचा वरदहस्त व राजकीय पाठबळाचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हप्तेखोरीमुळे हा व्यवसाय अधिकच फोफावत गेला. वादाच्या भीतीपोटी व राजकीय समीकरणे जुळविण्याच्या नादात याकडे सर्वच स्तरातून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज गावातील एका हॉटेलमध्ये राजरोसपणे दारूविक्री होते. त्याचप्रमाणे एसटी स्थानक परिसरात ही गावठी दारूसह नामांकित कंपन्यांच्या बाटल्या विकल्या जात असल्याची माहिती समजते. भांडणतंटा नको म्हणून कोणी तक्रार देण्यासही धजावत नाही.देहूगाव-आळंदी रस्त्यावरील बहुतेक हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री केली जात आहे. विठ्ठलवाडी परिसरातील टेकडीच्या पायथ्याला दोन गावठी दारू विक्रीव्यवसाय सुरू आहेत. सध्या या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे व्यवसाय जोरात आहेत. येलवाडी हद्दीतील हॉटेलांमध्ये व खासगी जागेतही अशी दारूविक्री सुरू आहे. या भागात पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. उत्पादन शुल्क विभागाने नावापुरते छापे दाखवले आहेत. तळवडे हद्दीतील स्मशानभूमीजवळील दारूभट्टीवर नुकतीच पोलिसांनी फक्त देखाव्यापुरती कारवाई केली. याचा परिसरात देहूरोड पोलीस, शहर पोलीस हद्द व चाकण पोलीस हद्द सुरू होते. या हद्दीच्या वादातून अशा प्रकारच्या सीमावर्ती भागात दारू बनविणे व विक्री करणे जोमात सुरू आहे. पोलीस मात्र याकडे हद्दीचा प्रश्न निर्माण करून वेळ मारून नेत आहेत.