Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 04:16 PM2021-09-28T16:16:25+5:302021-09-28T16:16:31+5:30

शिवदुर्ग ठरली भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था

after 12 days of untiring efforts of Shivdurg, the peak climbing expedition to Shoshala in the Himalayas was successful | Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी

Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी

Next
ठळक मुद्देशोशाला पिक ची उंची 750 मीटर क्लायबींग रुट व समुद्र सपाटीपासून 4700 मिटर आहे.

लोणावळा : सह्याद्रीच्या अनेक मोहिमा सर करणार्‍या लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्थेनं हिमालय प्रदेशात रक्षम गावातील बास्पा व्हॅली मधील शोशाला पिक क्लायबिंग मोहीम यशस्वीपणाने सर करत ही मोहिम फत्ते करणारी भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था म्हणून नाव कोरले आहे. अशी माहिती शिवदुर्गचे सचिव सुनिल गायकवाड व सल्लागार अँड. संजय वांद्रे यांनी दिली.

ही मोहीम शिवदुर्गसाठी खुप महत्वाची होती. कारण हिमालयातील ही शिवदुर्ग मित्र ची पहिलीच मोहीम होती. आणि शोशाला पिक क्लायबिंग ची ही भारतीय पहिलीच मोहीम होती. म्हणजे या पुर्वी भारतामधील कोणीही हे शिखर सर केलेले नव्हते. सलग बारा दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर शिवदुर्ग टिम च्या क्लायंबर नी मोहीम फत्ते केली. पुर्ण मोहीमेत टीम ला पाऊस आणि थंडीचा  खुप सामना करावा लागला .

शोशाला पिक ची उंची 750 मीटर क्लायबींग रुट व समुद्र सपाटीपासून 4700 मिटर आहे. मोहीम ही सचिन गायकवाड सर, ॲड संजय वांद्रे, सुनील गायकवाड, अशोक मते, राजेंद्र कडु, आनंद गावडे, महेश मसने, गणेश गिद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सचिन गायकवाड सर क्लायबिंग टीमचे रोहीत वर्तक, भुपेश पाटील, योगेश उंबरे, ओंकार पडवळ, समीर जोशी यांनी सहभाग घेतला होता. 

 

Web Title: after 12 days of untiring efforts of Shivdurg, the peak climbing expedition to Shoshala in the Himalayas was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.