विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई ; वाकड पोलिसांकडून ५४ वाहने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 23:53 IST2020-04-01T23:47:57+5:302020-04-01T23:53:52+5:30
संचारबंदीनंतर उद्योगनगरीत जमावबंदी व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही काही वाहनचालक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. वाकड पोलिसांनी अशा चालकांवर बुधवारी (दि. १) कारवाई करण्यात आली. यात ५४ वाहने जप्त करण्यात आले.

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई ; वाकड पोलिसांकडून ५४ वाहने जप्त
पिंपरी : संचारबंदीनंतर उद्योगनगरीत जमावबंदी व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही काही वाहनचालक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. वाकडपोलिसांनी अशा चालकांवर बुधवारी (दि. १) कारवाई करण्यात आली. यात ५४ वाहने जप्त करण्यात आले.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत जमावबंदी व वाहन बंदीचा करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार वाकड परिसरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. विनाकारण बाहेर फिरू नका, असे वारंवार कळवण्यात येत आहे. मात्र तरीही काही वाहनचालक आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. अनेक जण वाहनावरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. वाकड पोलिसांनी थेरगाव, वाकड काळेवाडीसह विविध ठिकाणी वाहनचालकांकडे रस्त्यांवर फिरण्याबाबत विचारणा केली. अनेक जण कारण नसताना परिसरात फिरत असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे अशा ५४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली आहेत.