Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:44 IST2018-04-04T12:27:30+5:302018-04-04T12:44:18+5:30
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा
पिंपरी : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या प्रकरणी अनिता रवींद्र सावळे यांनी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र शिंदे,दिगंबर पडवळ या आरोपीसह इतरांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना रविवारी घडली, मात्र गुन्हा मंगळवारी दाखल झाला आहे. फेसबुकवर माहिलेविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हा दाखल केला आहे.फेसबुकवर अशी पोस्ट करणारे कार्यकर्ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का? याचा वाकड पोलीस तपास करीत आहेत.