विहिरीच्या काठावर ओढणी; संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:56 IST2025-06-26T11:55:33+5:302025-06-26T11:56:11+5:30

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ४५ फूट खोल असलेल्या विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडला, आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली

A well was dug on the bank; Suspiciousness led to the release of a 45-foot underwater camera and the ground beneath the feet shifted | विहिरीच्या काठावर ओढणी; संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् पायाखालची जमीन सरकली

विहिरीच्या काठावर ओढणी; संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् पायाखालची जमीन सरकली

पिंपरी चिंचवड: दिघीमध्ये विहिरीच्या काठावर सापडलेल्या ओढणीच्या आधारे एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. वैष्णवी इंगवले असे या १८ वर्षीय तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्ष वय असलेली वैष्णवी इंगवले अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. मात्र ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली होती. तिथून जवळच एक विहीर होती. आणि विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली. पोलिसांना संशय आला. त्यांनी या ४५ फूट खोल असलेल्या विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडला. आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण विहिरीच्या तळाशी वैष्णवीचा मृतदेह होता. हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करत आहेत.

विहिरीच्या काठावर ओढणी, संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला..

वडिलांनी वैष्णवी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली. तिथून जवळच असणाऱ्या विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तातडीने  विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडला. तर तळाशी ४५ खोल फूट विहिरीत वैष्णवी इंगवलेचा मृतदेह आढळून आला. वैष्णवीची हत्या की आत्महत्या याबाबत दिघी पोलिसांकडून तपास सुरु आहे.   

Web Title: A well was dug on the bank; Suspiciousness led to the release of a 45-foot underwater camera and the ground beneath the feet shifted