अरे देवा! आईसोबत सायकल खरेदीसाठी चाललेल्या नऊ वर्षांच्या मुलावर भिंत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:14 IST2023-03-13T18:14:35+5:302023-03-13T18:14:41+5:30

एका बंगल्याची भिंत मोडकळीस आली होती, तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने भिंत मुलाच्या अंगावर कोसळली

A wall collapsed on a nine year old boy who was walking with his mother to buy a bicycle | अरे देवा! आईसोबत सायकल खरेदीसाठी चाललेल्या नऊ वर्षांच्या मुलावर भिंत कोसळली

अरे देवा! आईसोबत सायकल खरेदीसाठी चाललेल्या नऊ वर्षांच्या मुलावर भिंत कोसळली

पिंपरी : आई सोबत सायकल खरेदी करण्यासाठी जात असलेल्या मुलाच्या बंगल्याची भिंत अंगावर पडून गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव मोहीतराजे अमित भोसले (वय ९) असे आहे. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी दोनच्या सुमारास रोकडे वस्ती, चिखली गावठाण येथे घडली. या प्रकरणी अमित कांतीलाल भोसले (वय ४०, रा. चिखली गावठाण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश विठ्ठल जाधव (रा. स्पाईन रोड, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी आणि मुलगा मोहीतराजे ज्या बंगल्याची भिंती ही मोडखळीस आली होती. तेथून पायी सायकल आणण्यासाठी जात होते. मात्र, ही भिंत मोहीतराजे याच्या अंगावर पडून तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. भिंती मोडकळीस आली असून त्यामुळे अपघात होण्याचा धोका असताना देखील आरोपीने त्याकडे दुर्लेक्ष करून फिर्यादीच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: A wall collapsed on a nine year old boy who was walking with his mother to buy a bicycle