माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना; मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:51 IST2026-04-04T15:51:08+5:302026-04-04T15:51:22+5:30

आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला.

A shocking incident that casts a shadow over humanity; A 7-year-old girl was tortured by a neighbor in Moshi, the accused was handcuffed | माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना; मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या

माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना; मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या

पिंपरी चिंचवडमोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ४० वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. 

त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title : घृणित कृत्य: मोशी में 7 वर्षीय बच्ची पर पड़ोसी ने किया हमला, गिरफ्तार।

Web Summary : मोशी में, एक 40 वर्षीय व्यक्ति को 7 वर्षीय लड़की पर यौन हमला करने के आरोप में गिरफ्तार किया गया। आरोपी ने उसे चुप रहने की धमकी दी। लड़की की मां और चाची ने दूसरे हमले का प्रयास देखा, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। पुलिस ने बीएनएस और पोक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है।

Web Title : Outrageous act: Neighbor arrested for assaulting 7-year-old girl in Moshi.

Web Summary : In Moshi, a 40-year-old man was arrested for sexually assaulting a 7-year-old girl. The accused threatened her into silence. The girl's mother and aunt witnessed a second attempted assault, leading to his arrest. Police have filed charges under BNS and POCSO Act.