शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार; भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक

By नारायण बडगुजर | Updated: June 28, 2025 13:44 IST

'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता.

पिंपरी : भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अ‍ॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांचे खासगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनीअटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवत तरुण भक्तांना वेश्या किंवा प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. या फसवणुकीचा उलगडा एका भक्ताच्या सायबर तज्ज्ञ मित्रामुळे झाला आहे.

प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (२९, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या बाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बाबा बावधन परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चालवत होता. 'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. यानंतर मंत्र जाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांत असलेल्या ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप 'एअर ड्रॉइड कीड' हे हिडन अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवत असे. हे अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्तांचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते.

या अ‍ॅपच्या साहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले, याबाबत माहिती सांगत होता. यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता. या प्रकाराचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना “प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा” असा आगळावेगळा सल्ला दिला. विशेष म्हणजे, शरीर सबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगत असे. त्याद्वारे मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत आणि त्याचे चित्रीकरण करत होता.

दरम्यान, एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला. संबंधित मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन अ‍ॅप सापडले. त्याच्या मदतीने मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा संबंधित तरुणाला आठवले की, आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच अ‍ॅप असल्याचे निष्पन्न झाले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुण भक्ताने थेट डायल ११२ क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित बाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दि. २८) रात्री बावधन पोलिस ठाण्यात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अ‍ॅपची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार, बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आयटी अ‍ॅक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिस तपास करत आहेत.

फसवणूक झाली असल्यास घाबरू नका ; तक्रार द्या

अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या. -  अनिल विभूते, वरिष्ठ निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSocialसामाजिक