रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी जाणाऱ्या मुलाला बिल्डरच्या कारची धडक; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 11:21 IST2023-04-18T11:21:47+5:302023-04-18T11:21:59+5:30

घटनेनंतर कारचालक आरोपी बिल्डरला जमावाकडून मारहाण

A boy crossing the road to fetch food was hit by a builder car Unfortunate death of a child | रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी जाणाऱ्या मुलाला बिल्डरच्या कारची धडक; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी जाणाऱ्या मुलाला बिल्डरच्या कारची धडक; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी : रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी दुकानात निघालेल्या सात वर्षीय मुलाला बिल्डरच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शिवाजी रावसाहेब काकडे (७) असे आहे. ही घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी रावसाहेब अण्णा काकडे (४१, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कारचालक असलेल्या अनिल बांगडिया (५६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भरधाव कारने सात वर्षीय मुलाला धडक दिली. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. तर कारचालक आरोपी याला तेथील नागरिकांनी मारहाण केली. या मारहाणीत आरोपी जखमी झाला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी संबंधित आरोपीची गाडी जप्त केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांनी दिली.

Web Title: A boy crossing the road to fetch food was hit by a builder car Unfortunate death of a child