धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:36 IST2023-03-08T13:36:44+5:302023-03-08T13:36:53+5:30

सणासुदीच्या काळात हा दुःखद प्रसंग घडल्याने तालुक्यात शोककळा पसरली

A 21-year-old youth who went to wash his hands and feet after playing Dhulivandan drowned in Indrayani | धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

तळेगाव दाभाडे : होळी आणि धुलीवंदनाच्या उत्साहात मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीनदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सणासुदीच्या काळात हा दुःखद प्रसंग घडल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील (२१, रा. तारखेड, पाचोरा, जि. जळगाव) असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वराळे (ता. मावळ) हद्दीत घडली. याप्रकरणी त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये माहिती दिली. आंबी येथील ७ ते ८ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले असता जयदीप पाटील याचा पाय घसरून तो खोल पाण्यात बुडाला.

Web Title: A 21-year-old youth who went to wash his hands and feet after playing Dhulivandan drowned in Indrayani