पिंपरीत दुकाने फोडून आठ लाखांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 17:51 IST2019-06-05T17:40:21+5:302019-06-05T17:51:01+5:30

बंद दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

8 lakhs of cash theft by breaking shops in Pimpri | पिंपरीत दुकाने फोडून आठ लाखांची रोकड लंपास

पिंपरीत दुकाने फोडून आठ लाखांची रोकड लंपास

पिंपरी : बंद दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. ४) सकाळी दहाच्या सुमारास पिंपरीतील साई चौक येथे उघडकीस आली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोईताराम केसाराम चौधरी (वय ३५, रा. आनंदनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई मार्केटमधील जय प्लाझा बेसमेंट येथे फिर्यादी चौधरी यांची तीन दुकाने आहेत. सोमवारी रात्री त्यांनी दुकाने कुलूप लावून बंद केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ग्रीलचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्याच्या वेळी दुकानात चोरी झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. 

Web Title: 8 lakhs of cash theft by breaking shops in Pimpri