शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील ६ तरुणांना अटक

By admin | Updated: June 9, 2015 05:42 IST

रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली आहे.

चाकण : मुटकेवाडी ( ता. खेड ) येथे १ जून रोजी झालेल्या रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली असून आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, यातील चाकण मधील दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरार आहेत. हा खून किरकोळ भांडणाचा राग व जमीन खरेदी- विक्री व्यवसायातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव व उपनिरीक्षक अंकुश माने यांनी दिली. आरोपींकडून एक पिस्तुल, एक गावठी कट्टा व फरार आरोपींच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यातील चाकणमधील दोन मुख्य सुत्रधारासह ४ संशयित पळून गेले आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा उर्फ ज्ञानेश्वर फुलचंद तांदळे (वय २३), श्रीधर लक्ष्मण पवार (वय १९), निलेश नागराजन पिल्ले (वय ३२), शशिकांत पंडित जगताप (वय २६), स्वप्नील सावळाराम बोकड (वय २३), सतीश अर्जुन पाटील (वय २३, सर्व रा़ सदगुरुनगर, भोसरी ) यांना आज ( ता. ८ ) मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पिल्ले हा गोट्या धावडेच्या टोळीतील व अंकुश लांडगे खून प्रकरणातील आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. याबाबतची अधिक माहिती अशी कि, चाकणमधील मुटकेवाडी येथे सोमवारी (दि.१ जून ) रोजी सकाळी अकराच्या सुमारास रोहन राजेंद्र भूरूक याच्यावर दोघांनी गोळीबार करून खून केला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातूनच हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून पोलिसांनी लक्ष केंद्रित केलेले दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरारी झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करीत आहेत. सात दिवसात खुनाचा गुन्हा उघड करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळून भोसरीतून अटक केली. या दोन तपास पथकात वरील अधिकाऱ्यांसह सहायक निरीक्षक सतीश घोडघर, पोलिस हवालदार मिरगे, शरद माने, संतोष मोरे, मोरेश्वर इनामदार, पृथ्वी पाटील, सुभाष राउत, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, चंदू वाघ, दत्ता बनसोडे यांचा समावेश होता. (वार्ताहर)-------------पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र ते दोघे चाकण परिसरातून फरारी झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. हे दोन्ही प्रमुख सूत्रधार चाकण परिसरातील असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत. किरकोळ भांडण व जमीन खरेदी विक्रीच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे.