शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला ५०० झाडांवर ‘कुऱ्हाड’

By admin | Updated: July 21, 2015 03:44 IST

शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली

पुणे : शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०१२ ते ३० जून २०१५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत ही वृक्षतोड झाली असल्याची माहिती उद्यान विभागाने प्रश्नोत्तरात दिली आहे. विशेष म्हणजे या तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणे अथवा त्यांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्याच्या आदेश असतानाही, केवळ ही झाडे लावल्याचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून ही वृक्षतोड केली जात आहे.महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील रस्ते, तसेच महापालिकेच्या प्रकल्पांच्या इतर कामांसाठी झाडे तोडली जातात. तर शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडूनही नवीन बांधकामांसाठी वृक्षतोडीस परवानगी दिली जाते. महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांत किती वृक्ष तोडण्यास परवानगी दिली, याबाबत उद्यान विभागास नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्याबाबत प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत १५ हजार ३९१ वृक्ष काढणे, तसेच फांद्यांच्या तोडण्यासाठी महापालिकेस अर्ज आलेले होते. त्यापैकी १३८०५ वृक्षांच्या फांद्या तोडण्यास परवानगी देण्यात आली असून, १५८९ अर्जदारांना पूर्ण वृक्ष काढण्यास, तसेच पुनर्रोपणकरण्यास परवानगी देण्यात आलेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ३२९ वृक्षांच्या तोडीची अथवा पुनर्रोपणाची परवानगीही नाकारण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)