चिंचवडमध्ये आढळले अडीचशे वर्षांपूर्वीचे रिद्धी- सिद्धी गणपतीचे मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:33 IST2025-09-29T18:33:35+5:302025-09-29T18:33:46+5:30
मंदिरात एकूण सहा मूर्ती असून शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी दिसून येत आहे

चिंचवडमध्ये आढळले अडीचशे वर्षांपूर्वीचे रिद्धी- सिद्धी गणपतीचे मंदिर
पिंपरी : पवना नदी तीरावरील चिंचवड ही भूमी भक्ती आणि शक्तीची मानली गेली आहे. या गावामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत. नवीन पूला जवळील रस्त्याजवळ रस्त्याचे आणि साफसफाई काम करत असताना सोमवारी अडीचशे वर्षे पूर्वीचे शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी गणपती असे मंदिर आढळून आले आहे.
महासाधू मोरया गोसावी आणि क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या भक्ती- शक्तीची साक्ष देणारे चिंचवडगाव आहे. या गावात अनेक देवदेवतांची पुरातन मंदिरे आहेत. पवना नदी तीरावर चिंचवडगावात चिंचेचा मळा प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये साफसफाई करत असताना मंदिर आणि मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. हे मंदिर दोन फूट बाय तीन फूट आकाराचे असून त्या ठिकाणी मूर्ती आढळून आलेले आहेत. हे मंदिर काळ्या दगडातील असून चुना मिक्स करून साकारले आहे.
काय आहे मंदिरात
मंदिरात एकूण सहा मूर्ती असून शंकराची पूजा करताना रिद्धी- सिद्धी दिसून येत आहे. तसेच नंदी हा भग्न अवस्थेत आहे, तसेच पिंडही दिसून येत आहे. येथील गणपती हा पद्मासनातील असून त्यावर मुकुट दिसून येत आहे.
पुष्करणीही होती
संबंधित ठिकाणी पुष्करणी होती. या पुष्करणी मधील पाणी गावातील मंदिरांसाठी वापरले जात होते. कालांतराने ही पुष्करणी नष्ट झाली. त्या जवळील भागातच छोटेसे मंदिर आढळले आहेत. मंदिर हे ६ बाय ५ फूट आकाराचे आहे. तसेच अडीच बाय अडीच आकाराच्या दगडामध्ये या मूर्ती कोरलेल्या असल्याचे दिसते. सुंदर या मूर्ती सुंदर असून अलंकार शोभनीय आहे.
चिंचवडगावामध्ये आजपर्यंत अनेकवेळा उत्खनन झाले. त्यावेळी देवदेवतांची मंदिरे आढळून आली आहेत. पवना नदीपात्रालगत वायव्य दिशेला चिंचेचा मळा आहे. त्या ठिकाणी पूर्वी वेस होती. या ठिकाणी स्वच्छता करत असताना मंदिर आढळले आहे. हे मंदिर साधारणपणे अडीचशे वर्षांपूर्वीचे जुने असावे, असा अंदाज आहे. - ब. ही चिंचवडे (इतिहासाचे अभ्यासक)