तुकाराम बीजनिमित्त ‘पीएमपी’कडून १२५ जादा बस; ४ ते ६ मार्च दरम्यान देहूगावसाठी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:20 IST2026-03-03T15:19:16+5:302026-03-03T15:20:39+5:30

राज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दि. ४ रोजी स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन, आळंदी येथून देहूगावसाठी एकूण ३५ जादा बस सोडण्यात येणार आहे

125 additional buses from PMP on the occasion of Tukaram Beej; Will run for Dehugaon between March 4 and 6 | तुकाराम बीजनिमित्त ‘पीएमपी’कडून १२५ जादा बस; ४ ते ६ मार्च दरम्यान देहूगावसाठी धावणार

तुकाराम बीजनिमित्त ‘पीएमपी’कडून १२५ जादा बस; ४ ते ६ मार्च दरम्यान देहूगावसाठी धावणार

पुणे : तुकाराम बीजनिमित्त देहूगाव येथे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. यंदा दि. ५ रोजी तुकाराम बीज असून, भाविकांच्या सुविधेसाठी दि. ४ ते ६ मार्च या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरातून देहूगावसाठी पीएमपीकडून १२५ जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच देहूगाव व आळंदीसाठी नियमित मार्गावरील ३४ बसेस सुरूच राहतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. पीएमपीकडून जादा बसेसची व्यवस्था नियमित तिकीट दराने केली आहे.

राज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दि. ४ रोजी स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन, आळंदी येथून देहूगावसाठी एकूण ३५ जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळ सत्रात ६ आणि दुपार सत्रात २९ बस सोडण्यात येणार आहे. दि. ५ मार्च रोजी स्वारगेट, मनपा भवन, निगडी, पुणे स्टेशन, देहूरोड स्टेशन आणि आळंदी येथून एकूण २०७ जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळ सत्रात ११६, तर दुपार सत्रात ९१ बस सोडण्यात येणार आहे. तसेच दि. ६ मार्च रोजी स्वारगेट, पुणे स्टेशन आळंदी आणि मनपा भवन येथून एकूण ४९ जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळ सत्रात ३३, तर दुपार सत्रात १६ जादा बस सोडण्यात येणार आहे.

देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतल्यावर अनेक भाविक आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. या भाविकांच्या सुविधेसाठी पुणे मनपा, पुणे स्टेशन आणि हडपर स्थानकातून जादा बस फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दि. ५ मार्च रोजी सकाळ व दुपार दोन्ही सत्रांत मिळून १८ जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

Web Title : तुकाराम बीज: पीएमपी देहू के लिए 125 अतिरिक्त बसें चलाएगा

Web Summary : तुकाराम बीज के लिए, पीएमपी 4-6 मार्च को पुणे, पिंपरी-चिंचवड से देहू के लिए 125 अतिरिक्त बसें चलाएगा। देहू और आलंदी के लिए नियमित मार्ग जारी रहेंगे। आलंदी की यात्रा को सुगम बनाने के लिए स्वारगेट, पुणे स्टेशन और हडपसर से अतिरिक्त बसें।

Web Title : Tukaram Beej: PMP runs 125 extra buses to Dehu

Web Summary : For Tukaram Beej, PMP will operate 125 extra buses to Dehu from Pune, Pimpri-Chinchwad, March 4-6. Regular routes to Dehu & Alandi continue. Additional buses from Swargate, Pune Station, and Hadapsar facilitate travel to Alandi.