Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:32 IST2025-11-25T19:24:46+5:302025-11-25T19:32:29+5:30

Mini Thailand Of India : जर तुम्हाला थायलंडची ट्रिप बजेटबाहेरची वाटत असेल आणि भारतातच तशाच स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम पर्याय उपलब्ध आहे.

नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेकजण परदेशात, खासकरून थायलंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण जर तुम्हाला थायलंडची ट्रिप बजेटबाहेरची वाटत असेल आणि भारतातच तशाच स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम पर्याय उपलब्ध आहे. हिमाचल प्रदेशात भारताचे ‘मिनी थायलंड’ म्हणून ओळखले जाणारे एक ठिकाण आहे. याची नैसर्गिक सुंदरता इतकी जबरदस्त आहे की, पहिल्याच नजरेत तुम्ही थायलंडची भुरळ विसरून जाल!

हिमाचल प्रदेशातील जीभी हे ठिकाण अनेक वर्षांपासून मिनी थायलंडची उपमा मिरवत आहे. येथील निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. हिरवीगार दऱ्या, उंच पर्वत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर शहर कोणत्याही पर्यटकाला शांततेचा अनुभव देते.

जीभीला येथील स्थानिक लोक 'कुली कंटडी' किंवा 'वीर की आर' या नावांनीही ओळखतात. तीर्थन व्हॅलीमध्ये वसलेले जीभीचे डोंगर आजूबाजूला घनदाट आणि शांत जंगलांनी वेढलेले आहेत. येथील नैसर्गिक सुंदरता पाहून तुम्ही थक्क व्हाल. दोन मोठ्या खडकांमधून वाहणारी नदी, हेच आहे 'मिनी थायलंड'!

जीभी येथील दोन मोठ्या खडकांच्या मधून शांतपणे वाहणारी मोठी नदी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हा नजारा अगदी थायलंडमधील बेटांची आठवण करून देतो. तीर्थन दरीच्या मध्यभागी वसलेल्या या जीभीमध्ये पावलोपावली नैसर्गिक सौंदर्य विखुरलेले आहे.

जीभीमध्ये दरीही आहे आणि सुंदर नदीही आहे. या ठिकाणची देवदार वृक्षांची घनदाट आणि नयनरम्य जंगले खूपच आकर्षक दिसतात. इथल्या शांत आणि सुमधुर वातावरणात वेळ घालवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात.

जीभीमध्ये एक अतिशय सुंदर नैसर्गिक धबधबा आहे, जो घनदाट जंगलांमध्ये लपलेला आहे. ट्रेकिंग करणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. जंगलातून वाट काढत या नैसर्गिक धबधब्याचे विहंगम दृश्य पाहणे आणि आनंद लुटणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

जीभी केवळ डोंगरांसाठी किंवा हिरवळीसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे नैसर्गिक सौंदर्यासोबतच अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत, जे तुम्हाला मानसिक शांतता आणि आनंदाचा अनुभव देतात.