बर्फाळलेल्या प्रदेशात पाण्यावर तरंगणारे हॉटेल; भाडे सोडा, नजारे पाहूनच म्हणाल अद्भूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:05 AM2020-02-06T11:05:26+5:302020-02-06T11:14:39+5:30

स्वीडनच्या उत्तरेकडील लॅपलँड क्षेत्रामध्ये ल्यूल नदीवर तरंगणारे हॉटेल आणि स्पा 'द आर्कटिक बाथ' मंगळवारपासून लोकांसाठी खुले करण्यात आले.

या ठिकाणी लाकडांपासून बनविलेला तरंगणारा रस्ता आणि बोटीच्या माध्यमातून जाता येते. विमानतळावरून जाण्यासाठी कार, हेलिकॉप्टरचाही वापर करता येतो.

या हॉटेलमध्ये केवळ 12 खोल्या आहेत. हे हॉटेल बांधण्याची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती.

आर्किटेक्ट बर्टिल हैरस्ट्रॉम आणि जोहान कोप्पी यांनी या हॉटेलचे डिझाईन केले आहे.

. हे हॉटेल बनविताना नैसर्गिक वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे हॉटेल सुरू होण्याआधीच लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. 2020 आणि 2021 साठीचे बुकिंग आधीच सुरू करण्यात आले आहेत.

या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 815 पाऊंड म्हणजेच 75 हजार रुपये आहे.

खास बाब म्हणजे हे हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीच्या पाण्यावर तरंगत राहणार आहे. तर थंडीमध्ये बर्फ जमल्यामुळे एकाच जागी असणार आहे.

ल्युलिया विमानतळापासून हे हॉटेल केवळ सव्वा तासाच्या अंतरावर आहे. द आर्कटिक बाथच्या स्पा सेंटरमध्ये वेलनेस थीमवर काम करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना न्यूट्रिशन, व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी मेडिटेशन थेरेपी देण्यात येते.

या ठिकाणी आजुबाजुच्या प्रदेशात ध्रुवीय प्रदेशातील अस्वल पहायला मिळणार आहे. हॉर्स रायडिंग आणि नॅचरल फोटोग्राफीचा आनंदही घेता येणार आहे.

येथून नॉर्थर्न लाइट्सचा नजाराही पाहता येणार आहे.

पृथ्वीचा उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हा प्रकाश दिसतो. उत्तर ध्रुवावर हवेमध्ये गॅसचे कण फिरत असतात. येथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. जेव्हा या कणांवर अर्ध्यारात्री सूर्याची किरणे पडतात तेव्हा आकाशात रंगबेरंगी लाईट दिसू लागतात.

याचा आकार 20 किमी ते 640 किमी एवढा प्रचंड असतो.