CM शिंदेंच्या ठाण्यात उद्धव ठाकरे, आनंद दिघेंचं दर्शन अन् बंडखोरांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 05:56 PM2023-01-26T17:56:15+5:302023-01-26T18:05:05+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन प्रजासत्ताकदिनी ते बंडखोरांचा समाचार कसा घेणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन प्रजासत्ताकदिनी ते बंडखोरांचा समाचार कसा घेणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

स्व. आनंद दिघे यांच्या शुक्रवारी असलेल्या जयंतीपूर्वी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उद्या ठाण्यात असून तेही दिघे यांच्या समाधीस्थळी जातील अशी शक्यता आहे.

उद्धव हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. सकाळी १० वाजता हे शिबिर सुरू झाले.

शिवसेनेला पहिली सत्ता ही ठाण्यानेच दिली होती. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्याने मागील २९ वर्षे शिवसेनेला सलग सत्ता दिली. मात्र, सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांनी फारकत घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला. ठाण्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त ठाणे येथे आयोजित विविध कार्यक्रमांना उद्धव ठाकरेंची उपस्थित लक्षवेधी ठरली. यावेळी टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व प्रतिमा यांचा वापर शिंदे करीत आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. दिघे यांचा वारसा पूर्णपणे शिंदे यांच्याकडे जाऊ द्यायचा नाही, असा ठाकरे यांचाही प्रयत्न आहे.

उद्धव ठाकरेंनी येथील सभेत बोलताना नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे होते, ते विकले गेले, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी आहे, असेही ते म्हणाले.

जे गेले ते जाऊ द्या, जे अस्सल निखाऱ्यासारखे शिवसैनिक आहेत, ते माझ्यासोबत आणि शिवसेनेसोबत राहूनच उद्या मशाल पेटवतील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.

दरम्यान, मागील सहा महिन्यांत एकदाही ठाकरे ठाण्यात आले नव्हते. मधल्या काळात आदित्य ठाकरे यांनी दोन ते तीन वेळा ठाण्यात हजेरी लावली.

रश्मी ठाकरे या देखील ठाण्यात येऊन गेल्या. नवरात्र उत्सवाला उद्धव ठाण्यात येतील, अशी शक्यता होती. मात्र, ते फिरकलेच नाहीत. आता प्रथमच ते ठाण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये वारे संचारले आहे.