शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक; मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 12:20 PM

1 / 10
भिवंडी : (नितिन पंडीत) : केंद्र सरकारने घरगुती गॅससह पेट्रोल , डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असल्याने या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी आंदोलन करण्यात आले.
2 / 10
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भातील वंजारपट्टी नाका येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला लावलेल्या मोदींच्या जाहिरातीखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
3 / 10
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दरवाढीचा निषेध म्हणून रिकाम्या गॅसचा बाटला तिरडीवर ठेवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली.
4 / 10
याबरोबर, इंधन दरवाढीचा निषेध म्हणून हातगाडीवर मोटार सायकल तसेच चूल ठेऊन राष्ट्रवादीच्यावतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. 
5 / 10
केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून वेळोवेळी इंधन दरवाढ करत असून सामन्यांचे कंबरडे मोडीत आहे.
6 / 10
केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून आज हे आंदोलन मोदींच्या बॅनरबाजीखालीच केले असून देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ कमी केली नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे.
7 / 10
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.
8 / 10
अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आहे.
9 / 10
राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आज पेट्रोल दरवाढीविरोधात 'चूल मांडा' आंदोलन करण्यात येत आहे.
10 / 10
राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे 'चूल मांडा' आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे.
टॅग्स :bhiwandiभिवंडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPetrolपेट्रोल