सानिया मिर्झाचे ड्रेस एवढे सुंदर का असतात, माहिती आहे का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:16 IST2018-08-30T21:12:50+5:302018-08-30T21:16:21+5:30

सानिया एक चांगली टेनिसपटू आहे. पण सानियाला एक बहिण आहे, हे जास्त जणांना माहितीही नसेल.
सानियाच्या बहिणीचे नाव अनम मिर्झा आहे. अनम ही चांगली फॅशन डीझायनर आहे.
सानियाने कोणते ड्रेस परिधान करावेत, हे अनम ठरवत असते.
सानियाही अनमशिवाय अन्य कुणाकडूनही ड्रेस घेत नाहीत.
सानियाची आवड-निवड अनमला चांगलीच माहिती आहे. सानियाच्या आवडीनुसारच ती ड्रेस बनवते.