अलर्ट! ...तर 15 मेनंतर WhatsApp चा करता येणार नाही वापर; बंद होणार तुमचं अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:12 PM2021-05-05T12:12:41+5:302021-05-05T12:21:05+5:30

Whatsapp News : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे.

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहे. आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. अनेकांनी या पॉलिसीला विरोध केला असून नव्या मेसेजिंग app चा वापर करण्यासही सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 15 मे पूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा (Privacy Policy) स्वीकार करावा लागले, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास समस्या येऊ शकते किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंदही होऊ शकतं.

जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते. मात्र त्यावरून युजर्समध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला कंपनीच्या या पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल. कारण ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होती. परंतु ही तारीख वाढवून 15 मे करण्यात आली आहे. अ

15 मे रोजी WhatsApp नवी पॉलिसी लागू करणार आहे. जर एखाद्या युजरने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर 15 मेनंतर व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज पाठवू शकणार नाही किंवा मेसेज येणारही नाहीत.

15 मेपूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री डाउनलोड करू शकतात. मात्र 120 दिवसांनंतर इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट्सची चॅट हिस्ट्री मेसेज, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व डिलीट होईल.

WhatsApp च्या New Privacy Policy बाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना स्वीकारावी करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

WhatsApp मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज 24 तासांत आपोआप गायब होणार आहेत. सध्या पाठवण्यात आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मात्र आता कंपनी यात बदल करणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर 24 तासांच्या आत गायब होणार आहेत.

सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. मात्र हे व्हॉट्सअ‍ॅपवर जो व्यक्ती मेसेज पाठवतो तो हे सर्व ठरवू शकणार आहे. या फीचरला इनेबल करायचे की नाही हे पूर्णपणे युजरवर अवलंबून असणार आहे.

नव्या फीचरमध्ये 24 तासांसोबतच 7 दिवसांची सुविधा आधी प्रमाणे मिळत राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचरमध्ये सध्या 7 दिवसांची लिमिट दिली आहे. रिसिवर तुम्हाला मेसेज कॉपी सुद्धा करू शकता.

कंपनीने हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी करण्यात आले होते. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, नवीन फीचर भविष्यात अपडेट केले जाऊ शकते. जे iOS आणि Android सह सर्व प्लॅटफॉर्मसाठी जारी केले जाणार आहेत