WhatsApp वर तुमचे मेसेज दुसरं कुणीतरी वाचत तर नाही ना? लगेच 'ही' सेटिंग्ज तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:08 PM2022-05-23T16:08:33+5:302022-05-23T16:22:14+5:30

WhatsApp वर तुमचे वैयक्तिक मेसेज कुणी दुसरं तर वाचत नाहीय ना? ते कसं पाहावं आणि रोखण्यासाठी काय करावं? जाणून घ्या...

WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगसह टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स देखील सहज पाठवू शकता.

WhatsApp चे हे बेसिक फिचर्स तर तुम्हाला माहित आहेतच. पण WhatsApp वरचे तुमचे पर्सनल चॅट्स दुसरं कुणी वाचत असेल तर? तुम्ही म्हणाल WhatsApp तर एन्ड-टू-एन्ड इन्स्क्रिप्टेड आहे. त्यामुळे दुसरा एखादा व्यक्ती तुमचे मेसेज कसं काय वाचू शकतो?

WhatsApp वरील चॅट्स हे नक्कीच एन्ड-टू-एन्ड इन्स्क्रिप्टेड आहेत. पण याचे काही इतर फिचर्स देखील आहेत ज्यातून तिसरा व्यक्ती तुमचे चॅट्स सहज वाचू शकतो. यामागचं कारण म्हणजे तुमची एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.

तुमच्या WhatsApp वरचे मेसेज तिसराच व्यक्ती कसे काय वाचू शकतो याबाबतची माहिती जाणून घेऊयात. सर्वातआधी आपण WhatsApp च्याच अशा फिचर्सची माहिती करुन घेऊयात ज्यातून तुमचे चॅट्स लिक होऊ शकतात किंवा त्याचा अॅक्सेस इतरांना मिळू शकतो.

WhatsApp Web तर तुम्हाला माहितच असेल. नसेल माहित तर WhatsApp Web हे एक असं फिचर आहे ज्यातून तुम्ही तुमचं WhatsApp अकाऊंट डेस्क्टॉपवर म्हणजेच कॉम्युटरवर वापरू शकता. यातून तुम्ही जेव्हा लॅपटॉप किंवा डेस्क्टॉपवर काम करत असता तेव्हा WhatsApp चा वापर करणं तुम्हाला सोपं होऊन जातं.

WhatsApp Web तुम्हाला वारंवार लॉगइन करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे तिसरा एखादा व्यक्ती चोरुन तुमचं अकाऊंट हाताळण्याची शक्यता निर्माण होते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात तुमचा फोन सापडला आणि तुमचं डिव्हाइल अनलॉक असेल तर तो सहजपणे तुमचं WhatsApp अकाऊंट आपल्या स्वत:च्या डेस्क्टॉपवर ओपन करुन ठेवू शकतो. यातून संबंधित व्यक्ती तुमच्या मेसेजेसवर नजर ठेवू शकतो.

तुमचं WhatsApp अकाऊंट इतर कुणाच्या लॅपटॉप किंवा डेस्क्टॉपवर सुरू आहे का? हे कसं जाणून घ्यायचं असा विचार करत असाल तर सर्वात आधी तुमच्या फोनच्या लिंक्ड डिव्हाइस या पर्यायामध्ये जाऊन तपासा. तुमचं WhatsApp नेमकं कोणकोणत्या डिव्हाइसवर कनेक्ट आहे याची माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल.

तुम्ही परिचित नसलेलं एखादं डिव्हाइस जर यात केनेक्टेड दिसलं तर ते तातडीनं तुम्ही हटवू शकता. यासोबतच तुमचे मेसेजेस कुणी वाचलेत हेही तुम्हाला तिथंच कळून जाईल. कोणत्या डिव्हाइसवर आणि कुठे तुमचं अकाऊंट अॅक्टीव्ह होतं याची माहिती मिळेल.