अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार; एका फोनमध्ये 2 नंबर चालणार, 5 फीचर्स येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:12 PM2023-11-13T13:12:57+5:302023-11-13T13:28:06+5:30

WhatsApp : WhatsApp च्या पाच खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया, जे लवकरच येणार आहेत.

WhatsApp अत्यंत लोकप्रिय आहे. जगभरात त्याचे कोट्यवधी युजर्स आहेत. WhatsApp च्या पाच खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया, जे लवकरच येणार आहेत. यामध्ये ईमेल व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध असेल, त्यानंतर युजर्सला फोन नंबरवर मिळालेल्या ओटीपीची गरज भासणार नाही.

सर्चमध्ये कॅलेंडरचा पर्याय असेल आणि मल्टी अकाऊंट लॉगिनची सुविधाही असणार आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून ते युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. WAbetainfo या वेबसाइटने या फीचर्सची माहिती आधीच शेअर केली आहे.

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम असेल आणि तुम्हाला दोन्ही सिमवर WhatsApp चालवायचं असेल तर आधी तुम्ही क्लोन App वापरून हे करू शकत होतात. आता कंपनी नवीन फीचर आणत आहे, ज्यामध्ये एकाच App मध्ये दोन WhatsApp अकाउंट नंबर वापरता येतील. मेटाने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, ईमेल व्हेरिफिकेशन असं त्याचं नाव आहे. हे फीचर WhatsAppच्या अकाउंट सेटिंगमध्ये ईमेल एड्रेसच्या स्वरूपात पाहिलं जाऊ शकते. मात्र, ते स्टेबल व्हर्जनमध्ये कधी येणार याबाबत माहिती मिळालेली नाही.

WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. हे फीचर युजर्सना सर्चमध्ये कॅलेंडरच्या स्वरूपात दिसेल. त्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या जुन्या फाईल्स सहज शोधू शकतील. यामध्ये ते निवडक तारखा निवडून एखादी गोष्ट शोधू शकणार आहे. हे फीचर बीटा आवृत्ती V2.2348.50 मध्ये स्पॉट झालं आहे.

WhatsApp मध्ये लवकरच प्रायव्हसीबाबत एक नवीन फीचर येणार आहे. या फीचरचे नाव आहे Alternate Profile Privacy Feature. ज्यांच्याकडे तुमचा नंबर सेव्ह नाही अशा लोकांशी तुम्ही पर्यायी प्रोफाइल शेअर करू शकाल. पर्यायी प्रोफाइलमध्ये नाव, फोटो आणि इतर तपशील बदलले जाऊ शकतात.

WhatsApp आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांचे व्हिडीओ, फोटो आणि डॉक्यूमेंटंस ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवू शकतील. ही माहिती WAbetainfo ने देखील शेअर केली होती.