'ही' चूक पडेल महागात; WhatsApp करेल टेम्पररी ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 12:53 PM2019-09-03T12:53:56+5:302019-09-03T12:57:45+5:30

व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

व्हॉट्सअ‍ॅपच्या काही अटी आणि नियम पाळले नाहीत तर काही वेळ युजर्सना ब्लॉक केलं जाऊ शकतं. 

व्हॉट्सअ‍ॅपचे थर्ड पार्टी अ‍ॅप GB WhatsApp आणि WhatsApp Plus चा वापर केल्यास व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना टेम्पररी बॅन करतं. 

युजर्स या दोन्ही अ‍ॅपपैकी कोणत्या अ‍ॅपचा वापर करत असतील तर त्यांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQ) पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये हे दोन्ही अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे ऑफिशिअल व्हर्जन नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

थर्ड पार्टी अ‍ॅप असून ते व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नियमांचं उल्लंघन करतात. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर करणाऱ्या युजर्सना टेम्पररी ब्लॉक करतं. 

जर कोणत्याही युजरला अ‍ॅपमध्ये ‘Temporarily banned’ असा मेसेज आला तर युजर्स ऑफिशिअल व्हॉट्सअ‍ॅप ऐवजी अनसपोर्टेड व्हर्जनचा वापर करत आहेत.