Whatsapp च्या 'या' फीचरची कमाल! लिंक ओपन न करताच मिळणार सर्व माहिती; जाणून घ्या, कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:45 PM2022-05-17T12:45:38+5:302022-05-17T12:57:55+5:30

Whatsapp News : WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्यामुळे युजर्सचा बराच वेळ वाचेल.

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Meta चे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत आपल्या युजर्ससाठी आकर्षक फीचर्स आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना अ‍ॅप वापरणे सोपे होईल.

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याबद्दल समजल्यावर युजर्सला खूप आनंद झाला आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्यामुळे युजर्सचा बराच वेळ वाचेल.

हे फीचर प्लॅटफॉर्मच्या WhatsApp स्टेटस पर्यायाशी संबंधित आहे. या फीचर अंतर्गत, तुम्हाला आता स्टेटसमध्ये दिसणार्‍या कोणत्याही लिंकसाठी प्रीव्यू टाकण्याची संधी दिली जाईल त्यानंतर ते दिसेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या नवीन फीचरबद्दल सर्व काही जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या स्टेटस ऑप्शनसाठी 'प्रिव्ह्यू' फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सला लिंकवर जाण्यापूर्वीच कोणत्याही स्टेटसवरील लिंकमध्ये काय आहे याचा प्रीव्ह्यू मिळेल.

जर त्यांना ही लिंक उपयुक्त वाटली तर ते त्यावर क्लिक करू शकतात नाहीतर ते वगळू शकतात. त्यामुळे याचा फायदा होईल. सध्या तुम्ही कोणाच्याही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमधील लिंकबद्दल आधी माहिती घेऊ शकत नाही.

तुम्हाला एखाद्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये लिंक दिसली तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करून दुसऱ्या वेबपेजवर जावे लागेल. या नवीन फीचरनंतर तुम्हाला असा वेळ वाया घालवावा लागणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरवर सध्या काम केले जात आहे आणि ते व्हॉट्सअ‍ॅप iOS बीटा व्हर्जनवर दिसले आहे. हे फीचर iOS आणि अँड्रॉइड अ‍ॅप व्हर्जनसह WhatsApp च्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी रिलीझ केले जाईल अशी अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.