नवीन वर्षात WhatsApp वर येऊ शकतात 'ही' शानदार फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 10:13 AM2021-12-26T10:13:31+5:302021-12-26T10:24:58+5:30

WhatsApp : या वर्षात व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवीन फीचर्स आले आहेत आणि आता 2022 मध्ये देखील व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन फीचर्ससह येऊ शकतात.

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी अनेक नवीन अपडेट्स जारी करत असते, ज्याद्वारे युजर्संना नवीन फीचर्स देखील मिळतात. या वर्षात व्हॉट्सअॅपवर अनेक नवीन फीचर्स आले आहेत आणि आता 2022 मध्ये देखील व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन फीचर्ससह येऊ शकतात. ही फीचर्स कोणती असू शकतात, ते जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅपचे प्रतिस्पर्धी अॅप टेलिग्राममध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी अद्याप व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर्ससाठी उपलब्ध नाहीत. युजर्स काही चॅट्ससाठी 'रिपीट नोटिफिकेशन्स' फीचर वापरू शकतो, जेणेकरून त्या चॅटशी संबंधित नोटिफिकेशन्स निर्धारित वेळेनंतर पुन्हा दिसेल. जेणेकरून युजरचा कोणताही महत्त्वाचा मेसेज मिस होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवरील मल्टी-डिव्हाइस फीचरसह तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते चार डिव्हाइसवरून लिंक करू शकता, परंतु आजच्या युगात चार डिव्हाइसेसची संख्या खूपच कमी आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅप आपल्या वेब व्हर्जनसाठी चार डिव्हाइसची मर्यादा काढून टाकेल आणि युजर्स त्याला पाहिजे तितक्या डिव्हाइसमधून व्हॉट्सअ‍ॅप लिंक करू शकेल.

या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने स्वतःची UPI सेवा सुरू केली असून या फीचरला 'WhatsApp Pay' असे नाव देण्यात आले आहे. या फीचरमुळे युजर्स फक्त व्हॉट्सअ‍ॅप चॅटद्वारे सहजपणे पैशांचा व्यवहार करू शकतात. हे फीचर खूप चांगले आहे, पण जिथे त्याचे बटन आहे तिथे आधी चॅटवर मीडिया फाइल्स अपलोड करण्याचे बटन होते. त्या बटणाऐवजी व्हॉट्सअ‍ॅप पेचा ऑप्शन सुरू केल्याने, युजर्स पे बटणावर वारंवार क्लिक करतात, ते अटॅच बटण मानतात.

टेलिग्राम एक फीचरसह येते जे युजर्संना त्यांच्या अकाउंटवर सेल्फ-डिस्ट्रक्ट टाइमर सेट करण्यास अनुमती देते, ज्यानुसार प्लॅटफॉर्म स्वतः युजरचे अकाउंट डिलीट करण्यास सक्षम असेल. उदाहरणार्थ, जर युजर्सने सहा महिन्यांची कालमर्यादा सेट केली असेल, तर सहा महिन्यांनंतर अकाउंट स्वतःच डिलीट होईल.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी असे अनेक ऑप्शन जारी केले आहेत, जेणेकरुन ते आपल्या स्वतःच्या आवडीनुसार त्यांचे चॅट कस्टमाइझ करू शकतील, परंतु इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम सारखे थीम सपोर्ट अद्याप व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाहीत. मात्र, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही थीम सपोर्ट आणले जाण्याची शक्यता आहे. युजर्सला याची अपेक्षा करू शकतात.

दरम्यान, कंपनीने यापैकी कोणत्याही फीचर्सवर भाष्य केलेले नाही किंवा या फीचर्सबद्दल कोणतीही अफवा पसरलेली नाही. ही काही फीचर्स आहेत, जी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मच्या युजर्संना मिळाली आहेत आणि म्हणूनच अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर देखील अशी फीचर्स जारी केली जातील.