वेगवान इंटरनेट हवंय... कुठे सर्वाधिक ५G स्पीड?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:16 AM2023-07-27T11:16:09+5:302023-07-27T11:27:18+5:30

इंटरनेट क्रांती झाल्यानंतर अवघं जग जवळ आलं. काही दिवस, तासांमध्ये होणारी कामे काही मिनिटांमध्ये होऊ लागली.

तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर हीच कामे आता अवघ्या काही सेकंदात होऊ लागली. त्यास कारणीभूत ठरले ते फाइव्ह-जी तंत्रज्ञान. सुपरफास्ट इंटरनेट देणाऱ्या फाइव्ह-जीचा स्पीड देशनिहाय कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळा आहे. त्यानुसार फाइव्ह-जी इंटरनेटमध्ये कोणता देश आघाडीवर आहे, त्याबाबत...

द.कोरिया४३२.५, सिंगापूर३७६.८, ब्राझील३४६.४, मलेशिया३२२.७, कतार३१२.०

भारत३०१.६, बल्गेरिया३००.४, यूएई२९८.४, कुवैत२८४.९ , स्वीडन२७४.६

भारतात 5G आल्यानंतर भारतातील इंटरनेटच्या वेगात ११५% वाढ , फोर-जीच्या तुलनेत फाइव्ह-जी स्पीडमध्ये २५पट वाढ.

कोलकात्यात जानेवारी २०२३ मध्ये उच्चांकी ५०० एमबीपीएस स्पीड मिळाला.

ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत देशातील फाइव्ह-जीच्या जाळ्यात ५५% वाढजानेवारी २०२३ पर्यंत देशातील प्रमुख २० शहरांमध्ये सरासरी १२% भागात फाइव्ह-जी उपलब्ध झाले.

कुठल्या देशात किती टक्के 5G- पोर्टोरिको ४८.४%, द.कोरिया ४२.९%, कुवैत ३९.४%, अमेरिका ३१.१%, सिंगापू ३०.०% .

तैवान३०.३% , भारत २९.९%, बहरिन २६.८%, हॉंगकॉंग२६.४%, थायलंड२५.७% या देशांत एवढे टक्के 5G नेटवर्क आहे.