खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:57 IST2025-10-31T12:04:53+5:302025-10-31T12:57:09+5:30

सध्या जे फोन आहेत त्यांच्या किमती वाढणार नाहीत. मात्र नवीन स्मार्टफोनसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण येत्या काळात स्मार्टफोनच्या किमती आणखी वाढणार आहेत. सध्या जे फोन आहेत त्यांच्या किमती वाढणार नाहीत. मात्र नवीन स्मार्टफोनसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ग्लोबल चिपच्या मागणीमुळे हे झालं आहे.

स्मार्टफोनसोबतच AI एआय मॉडेल्समध्ये मेमरी चिप्स वापरल्या जातात. गेल्या काही वर्षांत, जगभरात अनेक AI मॉडेल्स उदयास आले आहेत आणि नवीन मॉडेल्स सतत विकसित होत आहेत. यामुळे मेमरी चिप्सची मागणी वाढत आहे.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, यामुळे अपकमिंग फोनच्या किमती वाढू शकतात. सॅमसंग आणि इतर अनेक कंपन्या त्यांचे नवीन फोन जास्त किमतीत लाँच करू शकतात.

स्मार्टफोनमध्ये वापरलेली अल्ट्रा-फास्ट रॅम चॅटजीपीटी, जेमिनी, ग्रोक आणि इतर AI बॉट्सना पॉवर देणाऱ्या AI सर्व्हरमध्ये देखील वापरली जाते.

AI टूल्सच्या वाढत्या मागणीमुळे, चिप मेकर्स सप्लाय पूर्ण करू शकत नाहीत. शिवाय, मेमरी चिप्सच्या किमतीही वाढल्या आहेत. कोरियन पब्लिशर हँक्युंगच्या रिपोर्टनुसार, या वर्षी त्यांच्या किमती ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. हे स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर्ससमोरचं आव्हान आहे.

फोन उत्पादक यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात. याचं एक उदाहरण म्हणजे चीनमध्ये लाँच झालेला शाओमीचा रेडमी के९०. कंपनीने हा फोन मागील व्हर्जनपेक्षा १०० युआन (अंदाजे १,२०० रुपये) जास्त किमतीत लाँच केला.

आता प्रश्न असा आहे की ग्राहकांनी काय करावं? जर तुम्ही विशिष्ट मॉडेल शोधत नसाल, तर तुम्ही आत्ता फोन खरेदी करू शकता. विशेषतः सध्या, काही फोन डिस्काऊंटमध्ये मिळू शकतात. यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.

स्मार्टफोन आता दमदार प्रोसेसर, कॅमेरे आणि बॅटरी लाइफसह येतात. तुम्हाला पाच ते सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देखील मिळतात. हे फीचर्स त्यांना दीर्घकालीन एक पॉवरफुल टूल बनवतात.