शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त २ मिनिटांत तुमचं अकाऊंट करा सुरक्षित; आजचं गुगलचं होम पेज पाहिलंत का?

By मुकेश चव्हाण | Published: February 09, 2021 7:09 PM

1 / 8
आज 9 फेब्रुवारीला जगभरात 'सुरक्षित इंटरनेट दिन' साजरा होत आहे. गुगलच्या पेजवर आज 'सेफर इंटरनेट डे' असल्याचं सांगत आपले अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी केवळ दोन मिनीटे लागतील असं सांगण्यात आलं आहे.
2 / 8
सध्याच्या युगात ऑनलाइन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची असल्याने आजच्या दिवशी 9 फेब्रुवारीला सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतो.
3 / 8
सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' साजरा करण्यात आला. तो काळ इंटरनेटचा वापर मर्यादित असण्याचा होता. पण भविष्यातील इंटरनेटच्या सुरक्षिततेचं महत्व लक्षात घेता तो युरोपमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपच्या या कृतीचे अनुकरण हळूहळू अनेक देशांनी केलं. सध्या जगातील जवळपास 150 देशांत आज सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतो आहे.
4 / 8
सुरक्षित इंटरनेट दिवसा'च्यानिमित्ताने गुगलने ऑनलाइन अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.
5 / 8
गुगल अकाउंट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. जीमेल, डॉक्स, ड्राइव्ह सारख्या गुगलच्या सेवा या अकाउंटशी जोडलेल्या असतात. त्यामुळे वेळोवेळी अकाउंट सुरक्षितता तपासून पाहिली पाहिजे.
6 / 8
डेस्कटॉप युजर्स गुगल अकाउंटमध्ये जाऊन 'रन सिक्युरीटी चेक' या पर्यायावर क्लिक करुन अकाउंटची सुरक्षितता तपासू शकतात.
7 / 8
मोबाइल युजर्सने आपल्या स्मार्टफोनमधील मेनू आयकॉनवर क्लिक करुन सेटिंग पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला आयडी टाईप करुन 'मॅनेज युअर अकाउंट'च्या पर्यायावर टॅप करावे.
8 / 8
तुम्हाला 'रन सिक्युरीटी चेक'चा पर्याय दिसेल. याशिवाय गुगलकडून तुम्हाला अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी २ स्टेप्स व्हेरिफिकेशन ऑन ठेवण्याची सूचना देण्यात येते.
टॅग्स :fraudधोकेबाजीInternetइंटरनेटIndiaभारत