Reliance Jio: जिओची हॅपी न्यू इयर 2022 ऑफर, 2545 रुपयांच्या प्लॅनसह मिळेल 29 दिवसांची अतिरिक्त वैधता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:48 PM2021-12-27T17:48:30+5:302021-12-27T17:52:21+5:30

नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या यूझर्सला नवीन ऑफरमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओने 2022 जवळ येत असताना नवीन वर्षासाठी विशेष प्रमोशनल प्रीपेड ऑफर लॉन्च केली आहे. नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या यूझर्सला नवीन ऑफरमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Jio त्यांच्या 2545 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह 29 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. या प्लॅनची पूर्वीची वैधता 336 दिवसांची होती.

यानंतर आता हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह असेल. पण, हा प्लॅन 2 जानेवारी 2022 पर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल.

जिओचा 2545 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 स्थानिक आणि राष्ट्रीय एसएमएससह 1.5 GB प्रति दिन डेटा मिळेल.

काही यूझर्सला माय जिओ अॅपद्वारे नवीन वर्षाची ऑफर दिसत आहे. पण, वेब पोर्टलवर अद्याप 336 दिवसांची वैधता दाखवली जात आहे.

2545 रुपयांचा प्लॅन घेतलेल्या यूझर्सला जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या खात्यात अतिरिक्त वैधतेसह 365 दिवसांची वैधता मिळून जाईल.

Jio दरवर्षी आपल्या प्लॅनवर नवीन वर्षाच्या ऑफर आणते. 2545 चा प्रीपेड प्लॅन 2020 च्या नवीन वर्षात लॉन्च करण्यात आला होता आणि त्याची किंमत 2020 रुपये होती.

याच प्लॅनमध्ये 2021 मध्ये 1 रुपये वाढ होऊन त्याची किंमत 2021 रुपये झाली होती. दरवाढीनंतर या वर्षी डिसेंबरमध्ये प्लॅनची ​​किंमत 2545 रुपये झाली आहे.