अवघ्या काही मिनिटांत करा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक; पाहा संपूर्ण प्रक्रिया

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 01:47 PM2021-01-18T13:47:52+5:302021-01-18T14:02:08+5:30

हल्ली संपूर्ण देशात आधार कार्डाचा वापर करण्यात येतो. सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी ते एक आहे.

सरकारनं अनेक ठिकाणी आपलं आधार कार्ड अन्य दस्तऐवजांशीही लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जर तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर सहजरित्या तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.

एनरॉलमेंट प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आधार कार्डाला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागतो. अनेकदा लोकं ते विसरतात किंवा आपला मोबाईल नंबरही बदतात. अशा वेळी त्यांना अनेक ससम्यांचा सामना करावा लागतो.

जर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर नसेल तर ते अत्यंत सोप्या पद्धतीनं करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला आधार एनरॉलमेंट / अपडेट सेंटरला जावं लागेल.

या प्रक्रियेसाठी ९० दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घेऊया कसा करता येईल मोबाईल नंबर आधारला लिंक.

सर्वप्रथम तुम्हाला आधार एनरॉलमेंट / अपडेट सेंटरला भेट द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला आधारमध्ये बदल करण्यासाठी असलेला फॉर्म भरावा लागेल.

जो क्रमांक तुम्हाला आधारशी लिंक करायचा असेल तो फॉर्मवर लिहा आणि त्यानंतर तो फॉर्म त्या ठिकाणी जमा करा.

त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बायोमॅट्रिक्स करावं लागेल.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याद्वारे तुम्हाला एक रिसिट दिली जाईल.

त्यावर असलेल्या URN द्वाके तुम्ही तुमच्या अपडेशनचं स्टेटस तपासू शकता.

मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही.

ज्यावेळी तुमचा नंबर आधारसोबत लिंक होईल त्यानंतर तुमहाला कोणत्याही आधारसंलग्न कामासाठी ओटीपी मिळण्यास सुरूवात होईल.

जर तुम्हाला तुमचं अपडेट केल्याचं स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला UIDAI च्या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करू शकता.

1947 हा आधाकचा टोल फ्री क्रमांक आहे. या ठिकाणी आपली भाषा निव़डून ग्राहक सेवा अधिकाऱ्याशी बोलूनही माहिती घेता येईल.