नवीन प्रायव्हसी पॉलिसी खटकतेय? 'या' आहेत WhatsApp Account कायमचे डिलीट करायच्या स्टेप्स

By देवेश फडके | Published: January 12, 2021 03:26 PM2021-01-12T15:26:08+5:302021-01-12T15:32:05+5:30

WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कोट्यवधी युझर्स नाराज झाले आहेत. नवीन पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅपचा चॅट डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याचा विचार करीत आहेत. व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट केला की, तुमचा डेटा रिकव्हर करता येणार नाही, हे लक्षात ठेवावे. WhatsApp Account डिलीट करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घ्या...

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp वर जगभरातून टीका केली जात आहे. WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कोट्यवधी युझर्स नाराज झाले आहेत. अनेकांनी व्हॉट्सअॅपला रामराम केले आहे. तर अद्यापही हजारो युझर्स व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करण्याच्या तयारीत आहेत.

व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीमुळे सिग्नल अॅपला मात्र प्रचंड फायदा मिळाला आहे. कारण जगभरातील कोट्यवधी युझर्स आता सिग्नल अॅपवर यायचा विचार करत आहेत. नवीन पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅपचा चॅट डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याचा विचार करीत आहेत.

व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करणे म्हणजे तुमचा आतापर्यंतचा सर्व डेटा कायमचा डिलीट करणे होय. जर पुन्हा तुम्हाला अकाउंट रिअॅक्टिवेट करायचा असेल; तर मात्र, तुमचा डिलीट झालेला अकाउंटचा डेटा रिकव्हर करता येणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असे सांगितले जात आहे. WhatsApp Account डिलीट करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घ्या...

सर्वांत आधी आपल्या फोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा. आता उजव्या बाजूला सर्वांत वर दिसत असलेल्या तीन डॉटवर टॅप करा. यानंतर सेटिंग्समध्ये जा. आता अकाउंटवर टॅप करा. Account मध्ये दिसत असलेल्या Delete my account ऑप्शनवर टॅप करा.

Delete my account ऑप्शनवर गेल्यानंतर कंट्री कोडसोबत आपला मोबाइल क्रमांक एन्टर करा. आता Delete my account वर टॅप करा. यानंतर अकाउंट डिलीट करण्यासाठी विचारल्या गेलेल्या कारणावर टॅप करा. पुन्हा Delete my account वर जा. यानंतर तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी पुन्हा Delete my account वर टॅप करावे लागेल.

फायनल पेजवर Delete my account बटनावर टॅप केल्यानंतर तुमचे अकाउंट आणि संपूर्ण डेटा डिलीट होईल. हा डेटा पुन्हा रिकव्हर होणार नाही. त्यामुळे अकाउंट डिलीट करण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेला व्हॉट्सअॅप डेटा, चॅट, मीडिया आणि डॉक्यूमेंट्सचे बॅकअप जरूर घ्या. पुन्हा व्हॉट्सअॅप जॉइन करायचे असेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट बनवावे लागेल.

दरम्यान, WhatsApp ने अलीकडेच आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्सअॅप युझर्सचा कोणताही डेटा किंवा मेसेजेस फेसबुकसोबत शेअर केले जात नाही, असा दावा व्हॉट्सअॅपकडून करण्यात आला आहे.

नवीन पॉलिसी ही बिझनेस अकाऊंट समोर ठेवून तयार करण्यात आली आहे. WhatsApp कोणत्याही युझर्सचे मेसेजेस पाहू शकत नाही किंवा केलेल्या कॉल्समधील संभाषण ऐकू शकत नाही. एवढेच नाही, तर शेअर केलेले लोकेशनही पाहू शकत नाही. फेसबुकही नाही, असेही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.

WhatsApp युझरचे कोणतेही कॉन्टॅक्ट फेसबुकसोबत शेअर केले जात नाही. व्हॉट्सअॅपवरील सर्व डेटा हा एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड असतो. तो वापरकर्त्यांशिवाय कोणीही पाहू शकत नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप युझर्स डिसअॅपियरिंग मेसेज सेट करू शकतात. यामुळे मेसेज पाठवल्यानंतर तो काही वेळाने डिसअॅपियर होईल, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.