तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:24 IST2025-10-08T20:19:02+5:302025-10-08T20:24:01+5:30
iPhone Battery Life: आजच्या काळात स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता, आपल्या आयफोनची बॅटरी दिवसभर टिकवणे हे एक मोठे आव्हान ठरते.

अनावश्यक ॲप्स पूर्णपणे बंद करा: अनेक ॲप्स तुम्ही वापरत नसतानाही बॅकग्राउंडमध्ये सतत चालू राहतात आणि डेटा सिंक करत राहतात. यामुळे बॅटरीचा वापर खूप वाढतो. कामाचे नसलेले ॲप्स त्वरित बंद करून बॅटरीची बचत करा.
स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा: आयफोनच्या बॅटरीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे स्क्रीनचा उजेड (ब्राइटनेस). ब्राइटनेस जितका जास्त असेल, तितकी बॅटरी लवकर संपते. शक्य असल्यास, स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा.
बॅकग्राउंड ॲप रिफ्रेश बंद करा: अनेक ॲप्स 'बॅकग्राउंड ॲप रिफ्रेश' चालू असल्याने आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे डेटा आणि बॅटरी दोन्ही वापरले जाते. सेटिंग्जमध्ये जाऊन हे फीचर बंद करा.
लो पॉवर मोड वापरा: जेव्हा बॅटरी कमी असेल, तेव्हा हा मोड तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतो. हा मोड चालू केल्यास मेल फेच करणे, सिरी (Siri) आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांसारख्या अनेक सेटिंग्ज कमी होतात आणि बॅटरी जास्त वेळ टिकते.
नवीनतम iOS अपडेट करा: काहीवेळा जुन्या iOS अपडेट्समध्ये बॅटरीचा वापर वाढवणारे बग्स असू शकतात. कंपनी हे दोष दूर करण्यासाठी नवीन अपडेट्स जारी करते. त्यामुळे, तुमच्या आयफोनमध्ये नवीनतम iOS अपडेट तपासणे आणि ते इन्स्टॉल करणे महत्त्वाचे आहे.
बॅटरीची स्थिती तपासा: तुमचा आयफोन खूप जुना झाला असेल आणि बॅटरीची कमाल क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली असेल, तर बॅटरी लवकर संपू शकते. बॅटरी सेटिंग्जमध्ये जाऊन तिची आरोग्य स्थिती तपासा. क्षमता खूप कमी असल्यास, बॅटरी बदलण्याची आवश्यकता असू शकते.
चांगल्या प्रतीचा चार्जर वापरा: फोन व्यवस्थित चार्ज होत आहे की नाही, याची खात्री करा. बॅटरीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि योग्य चार्जिंगसाठी नेहमी चांगल्या प्रतीचा आणि प्रमाणित चार्जर वापरत आहात याची खात्री करा.